Bhadgaon : नात्याला काळीमा, चुलत भावाच्या अत्याचारातून १३ वर्षीय पीडिता गर्भवती

जानेवारी 15, 2026 5:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । देशासह महाराष्ट्रात महिलासंह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी कमी होताना दिसत नसून अशातच भडगाव तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलीय. २२ वर्षीय तरुणाने त्याच्या १३ वर्षीय अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. या कृत्यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी नराधम चुलत भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime jpg webp

काय आहे प्रकार?
भडगावमधील एका गावात राहणाऱ्या नराधम तरुणाने नात्याचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत आपल्या सख्ख्या चुलत बहिणीवर सातत्याने अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. काही दिवसांपासून मुलीच्या प्रकृतीत बिधाड जाणवू लागल्याने तिला तातडीने भडगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान ती गरोदर असल्याचे निष्पन्न होताच कुटूंबियांच्या पायाखालची वाळू सरकली.

Advertisements

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने भडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भावाविरोधात बलात्काराचे गंभीर कलम तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now