जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । शुक्ल यजुर्वेदिय ब्राह्मण मंडळ जळगाव’तर्फे समाजाचे आद्यपुरुष महर्षी योगीश्वर याज्ञवल्क्य जयंती उत्सव सालाबादा प्रमाणे साजरा करण्यात आला.

यावेळी महर्षी याज्ञवल्क्य यांचे जीवन कार्याचा परिचय उपस्थीतांना करुन देण्यात आला. तर मंडळाचे अध्यक्ष अमोल जोशी यांचे हस्ते महर्षीं याज्ञवल्क्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. मंडाळाचे जेष्ठ सदस्यांनी उपस्थितीतांना महर्षी याज्ञवल्क्य यांच्या कार्याची माहिती करुन दिली. या प्रसंगी मंडळाचे सचिव संदिप कुळकर्णी, सहसचिव अतुल पाठक, कार्यकारणी सदस्य राजेंद्र दसरे, राजेश नाईक, राजेश कुळकर्णी यांच्या सह सौरभ कुळकर्णी व समाज बांधव हे उपस्थित होते.








