जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२४ । सार्थ त्रिशती शिवराज्याभिषेक महोत्सवाचे औचित्य साधून विश्वातील पहिले अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचा प्रारंभ २६ रोजी नूतन मराठा महाविद्यालयात झाला . संमेलनाचे आयोजन इतिहास प्रबोधन संस्था, महाराष्ट्र व नूतन मराठा महाविद्यालय , जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ते २९ जून दरम्यान करण्यात आले आहे. यावेळी विरगळ प्रदर्शन , आरमार प्रदर्शन , चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षा डॉ.केतकीताई पाटील, इतिहास प्रबोधन मंडाळाचे विश्वस्त रवींद्र पाटील , मंडळाच्या सचिव भारतीताई पाटील, राहुल पवार , पुणे येथील अनिल दुधाळे, रावेर येथील डॉ. संदीप पाटील, प्रा. राजेंद्र देशमुख, रावेर येथील किलबिल अकॅडमी च्या प्राचार्य नयनाताई पाटील , छत्रपती सेना नाशिक चे पदाधिकारी उपस्थतीत होते.
या प्रसंगी डॉ . केतकीताई पाटील आणि मान्यवरांनी प्रदर्शनीची पाहणी करून माहितीही जाणून घेतली. व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून डॉ. केतकीताई पाटील यांनी पुस्तक दालनास भेट देऊन पुस्तके खरेदी केली. या संमेलन स्थळी छत्रपती शिवाजी महाराज आणि माँ साहेब जिजाऊ यांची वेशभूषा केलेले बालक आकर्षण ठरत होते. प्रथम दिवशी युवकांनी या संमेलनास उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याचे निदर्शनास आले. शिवप्रेमींसह नागरिकांनी या संमेलनास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांसह संमेलन कार्याध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील यांनी केले आहे.
” अध्यक्षीय भाषण ” पुस्तकाचे प्रकाशन
इतिहास प्रबोधन संस्था, महाराष्ट्र व नूतन मराठा महाविद्यालय , जळगाव आयोजित अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री विजयराव देशमुख यांच्या हस्ते ” अध्यक्षीय भाषण ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हिंदवी स्वराज्य ऍपचेही लोकार्पण करण्यात आले असून त्याबद्दलची माहिती श्री विजयराव देशमुख यांनी जाणून घेतली.
याप्रसंगी संमेलनाच्या कार्याध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील, इतिहास प्रबोधन मंडळ महाराष्ट्राचे विश्वस्त रवींद्र पाटील , मंडळाच्या सचिव भारतीताई पाटील, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख , उप प्राचार्य के. बी .पाटील, संजय देशकर उपस्थित होते. श्री. विजयराव देशमुख यांनी हिंदवी स्वराज्य ऍप ची सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच हिंदवी स्वराज्य दिनदर्शिकेच्या वितरणाबद्दल सुद्धा माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.