⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | श्री क्षेत्र कुंडलेश्वरचे हभप भरत महाराजांच्या मधुर वाणीद्वारे अयोध्येत पार पडला श्रीराम कथा महोत्सव

श्री क्षेत्र कुंडलेश्वरचे हभप भरत महाराजांच्या मधुर वाणीद्वारे अयोध्येत पार पडला श्रीराम कथा महोत्सव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२४ । मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम कथा महोत्सव नुकताच अयोध्या नगरीत श्री क्षेत्र कुंडलेश्वर चे हभप भरत महाराज यांच्या मधुर वाणीद्वारे हजारो भक्त गणाच्या उपस्थितीत पार पडला. या महोत्सवाच्या सांगता समारोहात अर्थात काल्याच्या कीर्तनाप्रसंगी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील ह्या सहभागी झाल्या. या प्रसंगी उपस्थित संत महात्म्यांचे आशीर्वाद घेतले, महाआरती देखील केली. तसेच प्रभू श्रीराम यांचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या प्रसंगी जय श्रीराम, जय श्रीराम गजराने परिसर राममय झाला.

आदिशक्ती श्री संतश्रेष्ठ मुक्ताई यांच्या आशीर्वादाने व भगवान श्री कुंडलेश्वर प्रासादिक सद्गुरू झेंडूजी महाराज बेळीकर दिंडी परंपरा फड पुरस्कृत मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच दिव्य श्रीराम कथा महोत्सव अयोध्या येथील श्री मणीरामदास छावणी येथे आयोजित करण्यात आला होता. श्री क्षेत्र कुंडलेश्वर येथील हभप भरत जी महाराज यांच्या वाणीद्वारे येथे कथा वाचन झाली. १३ ते २१ ऑगस्ट २०२४ ह्या कालावधीत हा महोत्सव उत्साहात झाला. बुधवार दिनांक २१ रोजी या सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. या प्रसंगी डॉ केतकी ताई पाटील ह्या डॉ अनिकेत पाटील ह्यांच्यासह उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा लाभ त्यांनी घेतला.

यावेळी विश्व हिंदू परीषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा श्रीराम जन्मभूमी मंदिराचे महामंत्री श्री चपंतरायजी महाराज, श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्यनारायणजी महाराज, आचार्य मल्लिकार्जुन महाराज, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, काशी येथील विष्णु शास्त्री महाराज, हभप नरहरी महाराज आळंदी, हभप भरत जी महाराज श्री क्षेत्र कुंडलेश्वर, पाल येथील प्रतिनिधी दिव्य चैतन्यजी महाराज, ब्रज चैतन्य जी महाराज यांची उपस्थित होती. कथा महोत्सवासाठी सहभागी झाल्याबद्दल हभप भरत महाराज यांनी डॉ केतकी ताई पाटील यांना श्री ज्ञानेश्वरी भेट देऊन सन्मानित केले. या प्रसंगी भाऊ डॉ अनिकेत पाटील यांनी देखील भरत महाराज यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थितांसमवेत डॉ केतकी ताई पाटील व डॉ अनिकेत पाटील यांनी महाआरती केली.

यावेळी भुसावळ चे आमदार संजय सावकारे, जिल्हा महामंत्री परीक्षित बऱ्हाटे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष निळकंठ भारंबे, जळगाव येथील माजी नगराध्यक्ष बंडू काळे, भाजपचे विधान सभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, रावेर तालुका सर चिटणीस दुर्गेश पाटील, भुसावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुरलीधर पाटील, सभापती अनिल वारके, किरण महाजन यांच्यासह महाराष्ट्र शासन मंत्रालयाचे डॉ विजय महाजन तसेच सामाजिक क्षेत्रातील भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन हभप दीपक महाराज शेळगावकर यांनी तर आभार प्रदर्शन नितीन भोळे यांनी केले. यावेळी हजारो महिला पुरुष भाविकांनी मुक्कामी राहून कथा, कीर्तन श्रवण केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.