जळगाव जिल्हा
सावदा येथील श्री. स्वामी समर्थ केंद्राचे आमदार चंद्रकांत पाटीलांच्या हस्ते भूमिपूजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । सावदा येथे श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त येथील सुगंगा नगर येथे श्री स्वामी समर्थ केंद्राचे भूमिपूजन मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार मा. चंद्रकांत पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी सदर स्वामी समर्थ केंद्राचे भूमिपूजन आमचे हस्ते करताना आनंद होत असून एक आध्यात्मिक केंद्र येथे होतआहे. नागरीकांना या स्वामी समर्थ केंद्रात येऊन आध्यात्मिक साधना करता येईल याचे समाधान असल्याचे सांगितले. या प्रसंगी शहराध्यक्ष सूरज परदेशी, भरत नेहेते, नगराध्यक्षा अनिता येवले, नगरसेविका नंदाबाई लोखंडे, नगरसेवक धनंजय चौधरी, शिवसेना शहर सचीव शरद भारंबे, नितीन महाजन, प्रमोद माळी, शुभम चौधरी आदी उपस्थित होते.