एरंडोलजळगाव जिल्हा

श्रावण सरी आल्या धावून दूष्काळ सद्ष्य स्थिती गेली वाहून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 जळगाव लाईव्ह न्यूज  । १८ ऑगस्ट २०२१ । नितीन ठक्कर। जवळपास महिन्याभरा पासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे तालुक्यात पावसा अभावी खरीप पिकांची अवस्था नाजुक होऊन सर्वत्र दुष्काळ सदुष्य स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले अश्या संकटकाळी मंगळवारी भल्या पहाटे श्रावण सरींनी चोर पावलांनी हजेरी लावली . त्यानंतर दिवसभर व रात्री सुध्दा पावसाचा जोर वाढला एवढेच नव्हे तर बुधवारी दिवसभर श्रावणी पावसाने चिंब केले अश्या प्रकारे अदमासे तीस ते बत्तीस तास पाऊस झाल्याने उंबरठ्यावर आलेला कोरडा दुष्काळ श्रावणी पावसात वाहून गेला. परिणामी शेतकरी सुखावला असून खरीप हंगाम उतारा थोडा फार कमी झाला तरी साठ ते सत्तर टक्के हंगाम हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या पावसामुळे मुग व उडीद यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तालुक्यात सर्वत्र पाणीचपाणी चोहीकडे असे चित्र निर्माण झाले आहे या पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. विशेष हे की, मंगळवारी एरंडोल महसूल मंडळात ६९ मिलीमीटर व रिंगणगाव मंडळात ७३ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद तालुका प्रशासनाने केली आहे या दोन्ही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचे स्पष्ट होते. कासोदामहसूल मंडळात ५२ मिलीमीटर व उत्राण महसूल मंडळात ४८ मिलीमीटर इतक्या जलधारा बरसल्या एकूण ६०.५ इतकी जलवृष्टी झाली. खरिप पिकांच्या वाढीसाठी सदर पाऊस उपयुक्त ठरणार आहे. यावेळी एरंडोल येथे संततधार पावसामुळे एका घराची भिंत पडली. परंतू जिवीतहानी झाली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button