जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । भडगाव तालुक्यातील वाडे बांबरूड शिवारातील शेतात असलेल्या शेळ्यांच्या वाड्यावर लांडग्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यात शेळीची ६ पिले ठार, तर एक गंभीर जखमी झाले. यामुळे शेळी मालकाचे जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील वाडे बांबरूड प्र.ब.शिवारात सुरतसिंग सरदारसिंग परदेशी यांच्या शेतात शनिवारी सकाळी मोसंबी, लिंबू बाग व झोपडीत शेळीचे मृत पिले आढळून आली. त्यावेळी या घटनेचा उलगडा झाला. या शेतशिवारात लांडग्यांसह वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असतो. परदेशी यांचे हे शेत कजगाव वाडे रस्त्यानजीक व गिरणा जामदा डाव्या कालव्याला लागून आहे.
या शेतात हे विनोद भिल्ल यांचा परिवार राहतो. शेळीपालन व मोलमजुरी करून ते परिवाराचा उदरनिर्वाह चालवितात. आता शेळ्याच ठार झाल्याने या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. पशुपालक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. वनविभागाने तात्काळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
हे देखील वाचा :
- वृद्धेची चेन लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- जळगाव जिल्ह्यात डिप्लोमाच्या ‘एवढ्या’ जागा उपलब्ध
- फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे ; जळगाव जिल्हा उद्योग केंद्राचे आवाहन
- महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पाऊस झोडपून काढणार ; जळगावात कशी राहणार स्थिती?
- Gold Rate : जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याची झळाळी उतरली, आताचे नवीनतम दर तपासून घ्या..