---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

धक्कादायक : मंगलपुरीतील दारू पिल्यानंतर झाली रक्ताची उलटी, महिलेला अटक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२२ । शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या ३२ वर्षीय इसमाने दि.१६ रोजी दुपारी मंगलपुरी भागात पुष्पा ठाकूर यांच्याकडून दारू घेतली होती. दारू पिल्यानंतर रक्ताची उलटी झाल्याने त्या व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती धोक्याबाहेर आल्यानंतर त्यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

alcohol daru liquor jpg webp

रामेश्वर कॉलनीत राहणारे अमर रमेश भोळे वय-३२ यांना दारू पिण्याची सवय असल्याने दि.१६ मार्च रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ते मंगलपुरी भागातील पुष्पा ठाकूर यांच्या दारूच्या अड्ड्यावर गेले होते. त्याठिकाणी काम करणाऱ्या प्रकाश नावाच्या मुलाने त्यांना सांगितले कि मी मोहाची दारू आणलेली आहे. त्याने दारूच्या बाटलीत ती दारू टाकून दिली. दारू पिल्यानंतर अमर भोळे यांना रक्ताची उलटी झाली. त्यानंतर ते घरी येऊन झोपले असता त्यांना पुन्हा रक्ताच्या उलट्या झाल्या.

---Advertisement---

कुटुंबियांनी अमर भोळे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी गोदावरी हॉस्पिटल येथे पाठविले. प्रकृती अस्तावस्त असल्याने काही दिवस ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. बुधवारी पूर्ण शुद्दीवर आल्यानंतर अमर भोळे यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुष्पा ठाकूर या महिलेला अटक केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---