---Advertisement---
गुन्हे

साक्रीतील दरोडा अन् अपहरण प्रकरणात धक्कादायक सत्य समोर, प्रेमासाठी तरुणीनेच…

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२३ । धुळ्यातील साक्री येथे सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी 23 वर्षीय तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र या प्रकरणाच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांसह सर्वच जण चक्रावून गेले.

sakri case jpg webp

या घटनेत अपहरण झालेल्या संशयित तरुणी निशा मोठाभाऊ शेवाळे (वय २३) हिनेच दरोडा व स्वतःच्या अपहरणाचे नाट्य रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी विनोद भरत नाशिककर (वय ३८, रा. गायत्रीनगर, शाजापूर, मध्य प्रदेश) व रोहित संजय गवळी (वय २२, रा. मोगलाई, धुळे) यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

---Advertisement---

नेमका काय होता प्रकार?
साक्री येथील विमलबाई महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या दौलत बंगल्यात 25 नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. बंगल्यातील ज्योत्स्ना पाटील यांना दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत सोने,चांदीच्या दागिन्यांसह 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटला. त्यानंतर दरोडेखोरोंनी ज्योत्स्ना यांचे हात-पाय आणि तोंड बांधले. हा सगळा प्रकार घडला तेव्हा जोत्सा यांची भाची निशा शेवाळे ही देखील होती. दरोडेखोरांनी हत्यार दाखवत तिला घेऊन पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि निशाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र निशाचा शोध लागला आणि धक्कादायक सत्य समोर आलं.

निशा शेवाळे या तरुणीने आपल्या प्रियकरा सोबतच बनावट दरोड्याचा आणि अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आलेली आहे.पोलिसांनी या प्रकरणी निशा आणि तिच्या प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विनोदने आपल्या चार साथीदारांसह ज्योत्स्ना यांच्या घरी दरोडा टाकला होता. त्यात दागिने आणि रोकड लंपास केली.

यासोबत निशाचे अपहरणही केले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि निशाचा शोध लावला. सुरुवातीला निशा उडाव उडावीची उत्तर देत होती. मात्र पोलिसांनी तांत्रिक मुद्द्याच्या आधारे तपास केल्यावर निशानेच आपल्या प्रियकर विनोदला हाताशी घेत दरोडा आणि अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले. निशाला हा कट रचताना घटनेचे गांभीर्य लक्षात आले नाही. मात्र पोलिसांनी सखोल तपास केल्यावर सर्व वास्तव समोर आले आहे. पोलिसांनी मुख्य संशयितना ताब्यात घेतले असून, हरियाणा राज्यातील चौघे साथीदारांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, या घटनेतील आरोपी विनोद हा आधी तरुणीच्या घराशेजारीच राहत असल्याने तिच्या वडिलांशी त्याची ओळख होतीच. दरोड्यानंतर विनोद हा तरुणीच्या वडिलांच्या संपर्कात राहून तपासाबाबतचे सर्व अपडेट त्यांच्याकडून घेत होता. हे प्रकरण अंगलट येणार याची जाणीव झाल्याने त्याने तरुणीला पैसे देत घरी परतण्यास सांगितले. त्यानुसार रविवारी रात्री उशिरा पोलिसांच्या मदतीने ती साक्रीत पोहचली. रविवारी रात्री तिने आईच्या फोनवरून विनोदला फोन करत सावधही केले होते. अशा प्रकारे आपणच विणलेल्या जाळ्यात संबंधित तरुणी व इतर आरोपी अडकत गेले अन् पोलिसांनी या नाट्याचा एकएक पट उलगडला

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---