धक्कादायक : निवृत्त एसटी कर्मचार्याचा बसमध्येच मृत्यू
Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । भुसावळ येथील आठवडे बाजार करून कुर्हेपानाचे निवृत्त एसटी कर्मचारी भगवान दगडू बडगुजर (वय ७०) हे भुसावळ-औरंगाबाद बसने जात असताना त्यांचा बसमध्येच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी 11.30 वाजता घडली.
कुर्हेपानाचे येथील रहिवासी व एस.टी. महामंडळातील निवृत्त चालक भगवान बडगुजर हे भुसावळ येथून आठवडे बाजार आटोपून घरी कुर्हा येथे भुसावळ औरंगाबाद बसमध्ये अष्टभुजा देवीच्या मंदीराजवळील थांब्यावरून रविवारी सकाळी 11.30 वाजता बसले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अलकाबाई बडगुजर होत्या. गाडी थोड्या अंतरावर गेली असता, बडगुजर यांना घाम आला. त्यातच ते बेशुध्द पडले. त्यांना कुर्हा येथे त्यांचे चुलत भाऊ पंडीत बडगुजर यांनी गावातील डॉक्टरांकडे नेले.
त्यांनी त्यांना तत्काळ भुसावळ येथे हॉस्पीटलमध्ये नेण्यास सांगितल्यानंतर रीदम हॉस्पीटल येथे आणले असता तेथून ट्रामा केअर सेंटरला नेण्यास सांगितले. तेथे नेल्यावर त्यांची तपासणी केली असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी राज दगडू बडगुजर यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार हे पुढील तपास करीत आहे.