गुन्हेभुसावळ

धक्कादायक : अल्पवयीन मुलीला पळवून नेत प्रियकरासह बापाकडून अत्याचार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात सध्या अत्याचाराचे प्रमाण वाढले असून भुसावळ तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. पोलिसांनी तिचा शोध घेत तिला बालकल्याण समितीकडे ठेवण्यात आले होते. तिने जबाबात धक्कादायक माहिती दिली असून प्रियकरासह बापानेच अत्याचार केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या दोघांना अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता त्या दोघांना दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फेसबुकवर एका सोबत प्रेमाचं सुत जुळल्याने ती व तिचा प्रियकर दि. २९ सप्टेबर गुरुवार रोजी घरातून पळून गेले होते. मात्र, ही गोष्ट बापाला माहित नसल्याने वरणगाव पोलीसांत मूलगी सकाळी दहा वाजेला सायकलीने कॉलेजला जाते म्हणून सांगून गेली होती, संध्याकाळी सहा वाजेपर्यत ती घरी आली नाही, तिचा नातेवाईकांसह शोध घेत असताना तिची सायकल गवतात पडलेली दिसली. मात्र तिचा शोध लागलाच नसल्याने बापाने मूलीच्या हरविलेल्या बाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरिक्षक आशिष अडसुड यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीचा शोध घेत फौजदार नरसिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरातमधील सोरठी सोमनाथ येथून आणले. दरम्यान त्या मूलीला बाल कल्याण समितीकडे पाठविण्यात आले होते.

दरम्यान, पिडीत मूलीने आपल्या जबाबात प्रियकराने व आपल्या बापाने अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर वरणगाव पोलीसांनी प्रियकरासह मूलीच्या बापाला अटक केली असून याबाबत त्या दोघांविरोधात भादवी कलम ३७६ प्रमाणे पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सह उप पो. निरिक्षक परशुराम दळवी हे करीत आहे.

Related Articles

Back to top button