जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । अजानबाबातची तुम्ही जी कारवाई करत आहात ती बंद करा, अन्यथा तुम्हाला आम्ही ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू असं आशयाचं पत्र एका अज्ञात इसमाने बाळा नांगावकर यांना पाठवल आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी ते म्हणाले कि, पत्र कोणी दिलंय याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आलं आहे. गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पण मी एवढंच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी”
बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नेमकी काय चर्चा केली होती याची माहिती दिली नव्हती. भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि धक्कादायक माहिती सांगितली