जळगाव लाईव्ह न्यूज ।२२ मे २०२२ । ‘तू माझी नाही झालीस तर कुणाचीही होऊ देणार नाही’ असे म्हणत एका तरुणाने २० वर्षीय विवाहितेचे अपहरण करुन तिला डांबून ठेवले. काही दिवसांची तीच्या घरी जाऊन कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली.
निखिल वना सोनवणे (रा.आहुजानगर) याच्या विरुद्ध विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ मे २०२२ रोजी दुपारी ३ वाजता निखील याने शहरातील एका भागातील विवाहितेस गुजराल पेट्रोल पंपाजवळ अडवले. “तू माझी नाही झाली तर तुला मी कोणाचीच होऊ देणार नाही’ असे म्हणून त्याने चाकूचा धाक दाखवला. विवाहितेच्या हातातील फोन हिसकावून घेतला. तिला जबदरस्तीने दुचाकीवर बसवून शिवाजीनगर येथील त्याच्या मावशीच्या घरी नेऊन एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर १९ मे २०२२ रोजी सकाळी ५ वाजता तरुणीच्या राहत्या घराचे वॉलकंपाऊंडची भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. यावेळी निखीलने हातात काचेची बाटली आणून पीडित तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ केली.
तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शुक्रवारी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून निखीलच्या विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी पोलिसांनी निखीलला अटक केली आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर दाेन दिवसाची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.