---Advertisement---
गुन्हे बोदवड

धक्कादायक : सोशल मिडीयावर प्राध्यापक तरुणीचे अश्‍लील फोटो ठेवून बदनामी!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । प्राध्यापक तरुणीच्या नावाने फेक प्रोफाईल बनवून त्यावर अश्‍लील फोटो टाकून तरुणीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 09T170114.364

बोदवड शहरातील प्राध्यापक असलेली २४ वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १० सप्टेंबर ते २४ सप्टेंबर च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने तरूणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून तीच्या ओळखीचे व मित्रांना रीक्वेस्ट पाठवून तिची बदनामी व्हावी यासाठी बनावट खात्याच्या स्टेटसवर महिला व पुरूषांचे अश्लिल फोटो ठेवून बदनामी केली.

---Advertisement---

हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूणीने शनिवारी, 24 सप्टेंबर रोज जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने सायंकाळी अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---