धक्कादायक : जळगावात माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितली डॉक्टरला खंडणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । जळगावात माहिती अधिकार कार्यकर्ते म्हटले की काही मोजकेच नावे समोर येतात. माहिती अधिकार कार्यकर्त्यांमुळे अनेक कामे मार्गी लागली तर अनेक भ्रष्टाचार उघड झाले आहे. जळगावातील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकला माहिती अधिकार कार्यकर्त्याने ५० हजारांची खंडणी मगितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मयुर चाैधरी यांना जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील रहिवासी तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश कडू भाेळे याने ५० हजार रूपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी डाॅ. चाैधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव जिल्हा पेठ पाेलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा बुधवारी दाखल करण्यात आला आहे. यामुळे खंडणी बहाद्दरांमध्ये खळबळ उडाली आहे.
येथील डाॅ. मयुर नितीन चाैधरी हे येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करीत आहे, त्यांना दि. २८ जुले २२ या दिवशी माहिती अधिकारात दिनेश भाेळे यांनी ग्रामीण रूग्णालयातील माहिती मागितली. ग्रामीण रूग्णालयात झालेल्या कर्मचाऱ्याच्या भरतीची माहिती माहिती अधिकारात मागविली. ती माहिती त्यांना वेळेत दिल्यावरही त्याने माेबाईलवर मिसकाॅल केले. आलेल्या काॅलवर काॅल लावलाअसता, भाेळे यांनी सांगितले की, तुम्ही मला ओळखत नाही का, मी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वैद्यीकय अधिकाऱी यांची माहिती ठेवत असताे, मला तुम्ही माहिती अधिकारात अपूर्ण माहिती दिली. जी माहिती दिली आहे ती चुकीची आहे, माहितीच्या अधिकारात मी तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकताे, तुमचे वरिष्ठांना प्रसार माध्यामतून तुमची बदनामी करेल, तुम्हाला कामाला लावेल, तुमच्याकडे ग्रामीण रूग्णालयात माेठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला आहे. मी तुम्या ग्रामीण रूग्णालयाला व्हीजीट करणार आहे, सर्वांनी प्राॅपर गणवेशात व ओळखपत्र घालून हजर राहण्यास सांगा, यानंतर पुन्हा दाेन ते तीन दिवसांनी भाेळे यांनी फाेन करून मला ग्रामीण रूग्णालयाबाबत माहती पाहीजे, मात्र त्यांना माहिती दिल्याचे सांगण्यात आले. तुम्ही मला वारंवार फाेन करून त्रास देऊ नका, असे त्यांना सांगितले. तुम्ही येथे या मी तुम्हाला कपाटाची चाबी देताे तुम्हाला जी माहिती पाहीजे ती तुम्ही घ्या असे सांगितले.
जळगावात मागितली खंडणी
डाॅ. मयुर चाैधरी जळगाव येथे १० सप्टेबर २२ या दिवशी शासकीय कामानिमीत्त गेले असता, त्यावेळी सुध्दा भाेळे यांनी फाेन केला. त्यावेळी मी जळगाव येथे आलाे असल्याचे सांगितल्यावर त्यांनी रिंगराेडवरील पुणेरी अमृततूल्य या दुकानावर मला भेटायला या असे सांगितले. तेथे गेल्यावर त्यांनी मला चहा सांगायला लावाला, व तुम्ही मला चुकीची माहिती दिल्याचे सांगितले. तुम्ही काहीगाेष्टी माझ्यापासून लपवत आहे, तुमची नाडी माझ्या हातात आहे, असे म्हणत त्यांनी ५० हजार रूपये मला द्या नाही तर तुम्हाला खडी फाेडायला पाठवेल, तुमच्या वरिष्ठांना माझ्याजवळील पुरावे देईल, अशी धमकी दिली. यावेळी माच्या साेबत माझा मित्र राेहीत रणदिवे हा सुध्दा साेबत हाेता. तुला पैसे देणार नाही असे भाेळे याला सांगितल्यावर त्याने तुला आत्महत्याशिवाय पर्याय नसल्याची धमकी दिली. म्हणून व तेथून ताे निघून गेला. या सर्व प्रकारामुळे डाॅ. मयुर चाैधरी यांनी बुधवारी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश कडू भाेळे याच्या विरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.