जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । रावेर तालुक्यातील कर्जोत येथील दोन सख्खे भाऊ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या भीषण अपघातात गरिब कुटुंबावर काळाचा घाला आल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत रावेर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
सुनिल नारायण हरिजन (वय ३५) व अनिल नारायण हरिजन ( वय २३) असे मयत झालेल्या दोघा भाऊंचे नाव आहे. हरिजन हे कुटुंब खंडवा (मध्य प्रदेश ) येथील असून रावेर तालुक्यातील कर्जोत नजिक कामानिमित्त राहत होते. अत्यंत अठरा विश्वदारिद्र असणार्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. हा भीषण अपघात अंकलेश्वर ते बर्हाणपूर महामार्गावर आज दुपारी घडला. यात दोघे मजूरीचे काम करणारे सख्खे भाऊ ठार झाले असून या दोघी भाऊंचे लग्न झाले होते. अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, अपघाताची माहीती मिळताच पोलिस ग्रामीण रुग्णालयात पोहचले ससून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तर या भीषण अपघातात गरिब कुटुंबावर काळाचा घाला आल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.