जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । पत्नीची वाद झाल्याने चक्क पतीने आपल्या दोन महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान, सदर आरोपीच अटक करण्यात आली आहे. जितेंद्र ठाकरे (वय २१) असे आरोपीचे आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
भडगाव तालुक्यातील कराब येथे ही घटना घडली. दि.१८ रोजी खंडेराव काकरबर्डी येथे धार्मिक कार्यक्रम आटपून घरी आल्यानंतर आरोपी जिंतेन्द्र ठाकरे याचा आपल्या पत्नीची वाद झाला. या वादातून त्याने आपल्या दोन महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून दिले. हा प्रकार काही ग्रामस्थांनी पहिला. हे आरपीला लक्षात येताच त्याने विहिरीत उडी मारली.
गावकऱ्यांच्या सतर्कतेने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र चिमुकलीचा मृत्यू झाला. भडगाव येथील रुग्णालय उपचार सुरु असताना आरोपी जितेंद्र ठाकरे हा पसार झाला. तो पाचोरा येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली असून भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.