---Advertisement---
गुन्हे बोदवड

धक्कदायक : शेतकर्‍याचा शेतात फवारणी करताना विषबाधेने मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । बोदवड शहरातील ५७ वर्षीय शेतकर्‍याचा शेतात फवारणी करताना विषबाधेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पोलिसांत अस्कमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime 5 jpg webp

प्रभाकर रामदास दहातोंडे (57) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी दहातोंडे हे गुरुवारी 12.30 वाजेच्या सुमारास आपल्या उजनी रस्त्यावरील शेतात कपाशी पिकावर फवारणी करीत होते, मात्र विषारी औषध त्यांच्या तोंडात गेल्यानंतर त्यांना विषबाधा झाली व उलटी व मळमळ होवू लागताच त्यांना सरकारी दवाखान्यात आणले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. बोदवड पोलिसात या प्रकरणी अरविंद प्रभाकर दहातोंडे (29) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार युनूस तडवी करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---