⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

धक्कादायक : उताऱ्यावर केल्या खोट्या नोंदी, नगर भूमापन अधिकारी अटकेत

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । शहरातील नवीपेठ परिसरात असलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक 2118/32/फ/ड या जागेतील दुकानांची 1990 मध्ये रजिस्टर्ड खरेदी करण्यात आली होती. 2019 मध्ये तत्कालीन नगर भूमापन अधिकारी, परीक्षण भूमापन अधिकारी यांनी संगनमत करून केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्पवर फेरफार नोंदी करून इतरांची नावे लावून दिली होती. मुकेश टेकवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्यात तत्कालीन नगर भूमापन अधिकाऱ्यांसह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता अनेक अधिकारी यात अडकण्याची शक्यता आहे.

शहर पोलीस ठाण्यात दि.१५ रोजी कलम 420 सह इतर फसवणूक व संगनमत, कट करस्थानच्या कलम नुसार 1) किशोर अशोक पाटील. 2) चंद्रकात अशोक पाटील 3) साहेबराव फकिरा पाटील 4)डी.आरपाटील भूमापन अधिकारी जळगांव 5) संजय सोनार परिक्षण भुमापन अधिकारी जळगांव (6) हिराबाई अशोक पाटील 7) रत्ना तुषार भोसले 8 ) निर्मलाबाई धनराज पाटील 9) मिनाक्षी संजय काकडे 10) सुरेखा प्रभाकर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार रविंद्र सोनार करीत आहेत. शहर पोलिसांनी गुन्ह्यात चंद्रकांत अशोक पाटील आणि तत्कालीन नगर भूमापन अधिकारी दिलीप राजाराम पाटील यांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुकेश तुळशीदास टेकवानी यांनी दिलेली फिर्याद जशीच्या तशी पुढीलप्रमाणे,

समक्ष पोलीस ठाण्यात हजर होवुन फिर्याद लिहून देतो की, मी वरील ठिकाणी माझ्या कुंटुबासह एकत्र राहतो यातील नमुद आरोपी यांनी जळगांव शहरातील सिटी सके नं.2118/32 फ/डया जागे मधील नवीपेठ येथील तळमजल्या वरील दोन दुकाने त्यापैकी पहील्या दुकानाचे अमर स्टेअर्स याचे क्षेत्र 14.21 चौ.मी. व दुसरे दुकानाचे सदांनद कोल्डीक चे क्षेत्र 20,53 चौ.मी.ही मी सन 1990 साली कायदेशीर रजीस्टर्ड खरेदीखताने खरेदी घेतली असून त्यावर यातील नमुद आरोपी यांनी फक्त 100/- रुपयाचे प्रतिज्ञा पत्रा वरुन बेकादेशीर रित्या वारस याची नावे लावली आहेत.

वरील नमुद दोन दुकाने खरेदीखत दस्त क्र.4979/90 ने मी रजीस्टर्ड खरेदोखत दि.23/11/1990 रोजी रजीस्टर्ड खरेदीखतान्वये खरेदी केलेली आहे उपरोक्त मुळ खरेदी खतात सि.स.नं.2118/32 फ तो नजर चुकीने 2118/32 ड झालेले होता तो 2118/32 फ वाचण्यात यावा म्हणून रजिर्ड चुक दुरुस्ती लेखा व्दारे केला असुन सदरचा चुक दुरुस्ती दस्त कं.45/1992 ला दि.04/01/1992 रोजी अविनाश दत्तात्रय कानगो व इतर वारस यांनी करून दिला ही जागा घर नं. 196 नवीपेठ मधील तळमजल्यावरील दोन दुकाने जागेचे मूळ मालक दत्तात्रय देविदास कानगो रा.डी.52/503 गांधीनगर वांद्रे पूर्व मुंबई यांचे नावे असून ते मयत झाल्यानंतर सदर मिळकतीस त्यांचे ऐकुण 05 वारस होते म्हणून नावे लागली होती दि.25/11/1988 रोजी वारसांनी सदर मिळकतीचा सर्वस्वी मुखत्यार म्हणून अविनाश दत्तात्रय कानगो यांना मुखत्यार नेमलेले होते वर नमुद प्रमाणे अविनाश दत्तात्रय कानगो यांनी मुखत्यारपत्रानुसार व इतर वारस यांचे संमतीने नवीपेठ येथील जळगांव शहर सिटी सर्व नं.2118/32 फ/ड मधील नवीपेठ मधील तळमजल्या वरील दोन दुकाने त्यापैकी पहील्या दुकानाचे अमर स्टेअर्स याचे क्षेत्र 14.21 चौ.मी. व दुसरे दुकानाचे संदानंद कोल्डींक चे क्षेत्र 20.53 चौ.मी. हे दोन दुकाने खरेदीखत दस्त क्र. 4979/90 ने रजिष्टर खरेदीखत दि.13/11/1990 रोजी रजिष्टर खरेदी खतान्वये मी खरेदी केलेली आहे मी मालक असल्याने सदर ची मिळकत ही माझे नावे असून तेव्हापासून ते आजपावतो माझ्याच ताब्यात आहे.

ही मिळकत मी खरेदी करण्यापूर्वी ची माहीती अशी की, अविनाश दत्तात्रय कानगो यांनी नवीपेठ मधील तळमजल्यावरील दोन दुकाने हे फकिरा माधव पाटील रा खेडी बु.ता.जि. जळगांव यांना दस्त क्र.2728/1988 मध्ये अमर स्टोअर्स हे दुकान दस्त क्रं. 17/1989 संदानद हे दुकान यांना खरेदी खताने विकलेली होती. त्यानंतर फकिरा माधव पाटील यांनी पुन्हा उपरोक्त मिळकत क्रं.2118/32 फ चे वस्नमुद केल्याप्रमाणे हे दस्त क्रं 5076/1990 रोजी दि. 12/11/1990 रोजी रजिष्टर खरेदीखताने मूळमालक सुशिला दत्तात्रय कानगो व इतर यांना पुन्हा विक्री केलेली होती. सदरह उपरोक्त मिळकत वर नमूद केल्याप्रमाणे अविनाश दत्तात्रय कानगो यांनी मुखत्यारपत्राव्दारे व इतर वारसाच्या संमतीनुसार सरदची नवीपेठ मधील तळमजल्या वरील अमर स्टोअर्स व सदानंद कोल्डीक्स हे दोनही दुकाने रजिष्टर खरेदीखताने दस्त क्रं.4979/1990 दि. 23/11/1990 रोजी रजिष्टर खरेदी खताने मी विकत घेतलेली आहे व तेव्हापासून आजपर्यंत माझ्याच ताब्यात आहे

आरोपीचे आजोबा यांनी सदर मिळकत ही मूळमालक अविनाश दत्तात्रय कानगो व इतर याचे कडुन रजिष्टर खरेदी केली होती परंतु संदानद टी हॉऊस व अमर स्टोअर्स असलेली जागा ही मुळमालक अविनाश दत्तात्रय कानगो यांना पुन्हा रजिस्टर्ड खरेदीखताब्दारे दि. 12/11/1990 दस्त क्र.5076/1990 अन्वये विक्री केलेली असून त्यानंतर अविनाश दत्तात्रय कानगो व इतर यांनी संदानंद टी हाऊस व अमर स्टोअर्स असलेली जागा हो मला रजिष्टर खरेदीखतान्वये दस्त क्र.4979/1990 ने मला विक्री केलेली आहे त्या मिळकतीवर खालील सर्व आरोपी यांचा कोणताही हक्क व अधिकार नसतांना आरोपी 1) किशोर अशोक पाटील. 2) चंद्रकात अशोक पाटील 3) साहेबराव फकिरा पाटील 4)डी.आरपाटील भूमापन अधिकारी जळगांव 5) संजय सोनार परिक्षण भुमापन अधिकारी जळगांव (6) हिराबाई अशोक पाटील 7) रत्ना तुषार भोसले 8 ) निर्मलाबाई धनराज पाटील 9) मिनाक्षी संजय काकडे 10) सुरेखा प्रभाकर पाटील आरोपी क्र.1 ते 03 व क्र 06 ते 10 है रा 5 व विष्णु नगर गणेश कॉलनी, अशोक बेकरीच्या समोर जळगांव ता. जि. जळगांव यांनी सदरहू मिळकत क्र.2118/32 फ /ड 196 नवीपेठ मधील तळमजल्यावरील दोन दुकाने यांचे फक्त जुने खरेदीखत लावून व तसेच अविनाश दत्तात्रय कानगो यांना विक्री करून दिलेले खरेदीखत न दाखवता मला फसवणुकीच्या व माझी मिळकत हडप करणेच्या उद्देशाने मयत फकिरा माधव पाटील यांनी विक्री केलेले दस्त जाणून बुजून न जोडता मला फसवणुकांच्या उद्देशाने उपरोक्त मिळकती वर मे. कोर्टाकडून अधिकृत वारस दाखला (सक्सेशन सटीफिकेट) न घेतो 100/- रुपयाच्या साध्या प्रतिज्ञापत्रा वर वारस लावण्याकामी अर्ज केला व त्यानुसार तत्कालीन नगर भुमापन अधिकारी श्री डी आर पाटील व संजय सोनार परिक्षण भूमापन अधिकारी जळगांव यांना हाताशी धरून संगनमत करून उपरोक्त वारसांची नावाची खोटी फेरफार नोंद मला न कळविता मला कोणतीही लेखी सुचना व कायद्यानुसार कोणतीही नोटीस न देता परस्पर एकतर्फी यातील आरोपी क्र.4)डी आर पाटील भूमापन अधिकारी तत्कालीन जळगांव हे सेवानिवृत्त होण्याच्या दोन दिवस आधी वारस नावे लावून घेतली आहेत. बेकायदेशिररित्या संगनमत डी आर पाटील भूमापन अधिकारी व संजय सोनार परिक्षण भुमापन अधिकारी जळगांव यांनी दोघांनी संगमनंत करून फेरफार नोंदी करून दिल्या आहेत. दि. 14/01/2019 क्र.22170 व नोंद क्र 22171 ही दि. 14/01/2019 रोजी किशोर अशोक पाटील व इतर आरोपी यांनी खोटी वारस नावे लावून घेतलेली आहेत. सदरहू माहीती ही मला झाल्याने मी माझ्या मालमत्तेचा उतारा घेणे करीता गेलो असता मला मिळालेल्या माझ्या मालमतेचा उत्ता-या वरती वरील आरोपी याचा कोणताही मालकी हक्क नसतांना खोटी वारस नावे लावलेली मला आढळून आली मी त्याबाबत अधिक माहीती घेतली त्यानंतर नगर भूमापन अधिकारी सो यांचे कार्यालयाकडे मंजूर नोंदीवर हरकत बजा तक्रार अनेक वेळा केलेली आहे. तसेच नगरभुमापन अधिकारी व इतर यांनी स्वतःच संगनमत करुन सदरहू मिळकत हडप करण्याचे उद्देशाने

गैरव्यवहार केलेला असल्यामुळे तरी देखील आजपावेतो त्या वारसांची नावे उपरोक्त मिळकती वरुन कमी झालेली नाहीत व मी केलेल्या तक्रार अर्जाचा आजपावेतो कोणताही खुलासा केलेला नाही. तसेच यातील किशोर अशोक पाटील यांन सदरील नगरभुमापन अधिकारी सो जळगांव याचे कडे आवक क्र. 7926/2019 चा दि.01/01/2019 रोजी अर्ज करून सि.स.नं.2118/32 फ/ड यावरती वारस दाखला अॅफिडेव्हीटचा दाखल सादर केला असुन सदर संपूर्ण मिळकतीवर बेकादेशीररित्या संगनमताने व कटकारस्थान करुन वरील सर्व आरोपींनी संगनमत करुन वारसांची खोटी नोंद करुन घेतली आहे. सदरहू मिळकतीवर या आरोपीचे आजोबा फकिरा माधव पाटील हे दि.08/12/2001 रोजी मयत झालेले असून याची माहीती उपरोक्त आरोपीयांना स्वतहा माहीत असुन देखील मयत हे सुमारे 21 वर्षापूर्वीच मयत झालेले असुन देखील वरील आरोपी यांनी संगनमताने नगरभुमापन अधिकारी यांचेशी मोठा आर्थिक व्यवहार करुन त्यांना हाताशी धरून येकायदेशिरित्या फक्त 100/-रुपया च्या साध्या प्रतिज्ञापत्र वर खोटे दस्त व त्यातील मजकुर खरा असल्याचे भासवून व तयार करुन वारसांची नोंद करून घेतल्याने व सदरहू मिळकतीवर नाव लावल्याने माझी फसवणूक केलेली आहे उपरोक्त माझी मिळकत यावरती त्यांचा कुठलाही हक्क नसतांना खोटी वारस नाव लावून तो विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांची नावे लावून घेतलेली आहेत.

म्हणून माझी आरोपी क्र. 1 ) किशोर अशोक पाटील 2) चंद्रकात अशोक पाटील 3) साहेबराव फकिरा पाटील 4)डी आर पाटील तत्कालीन भूमापन अधिकारी जळगांव 5) संजय सोनार परिक्षण भुमापन अधिकारी जळगांव 6) हिराबाई अशोक पाटील 7) रत्ना तुषार भोसले 8) निर्मलाबाई धनराज पाटोल 9 ) मिनाक्षी संजय काकडे 11) सुरेखा प्रभाकर पाटील आरोपी क्रं.1 ते 8 हे रा5 4. विष्णु नगर गणेश कॉलनी अशोक बेकरीच्या समोर जळगांव ता.जि.जळगांव याचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे. उपरोक्त सर्व आरोपीनवर कायदेशीर गुन्हे दाखल करून मला न्याय मिळावा

माझी वरील फिर्याद ही माझे सांगणे प्रमाणे लिहीली असून तो मो स्वता वाचुन पाहीली ती बरोबर असुन तो जळगांव शहर पोलीस स्टेशन येथे टंकलिखीत करुन संगणीकृत करण्यात आलेली आहे.