⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

धक्कादायक : क्रेन ऑपरेटरचे हृदयविकाराने मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । चोपडा शेतकरी सहकारी कारखाना अर्थात बारामती ऍग्रो युनिट ४मधील कामगाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना १८ रोजी सकाळी ६.३० वाजता घडली. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता त्यांच्या मूळगावी बानेगाव (जि. नाशिक) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक भाऊराव देवकर (वय ३०, मूळ रा. बानेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे मयत तरुणाचे नाव आहे. देवकर हा बारामती ऍग्रो युनिट ४मधील मील सेक्शन इंजिनिअरिंग विभागातील क्रेन ऑपरेटर काम मरत होता. याला १७ रोजी रात्री अडीच वाजता छातीत वेदना हाेत असल्याने त्याला कारखान्यातील दोन कर्मचाऱ्यांनी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सकाळी ६.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. पवन पाटील यांनी त्यांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता त्यांच्या मूळगावी बानेगाव (जि. नाशिक) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मनोज पाटील, प्रकाश पाटील, प्रशांत कंखरे, राजू सोनवणे, बबलू परदेशी, गोतिश मास्तर, विनोद पाटील व सुमारे ३० कर्मचारी हजर होते. तर उपजिल्हा रुग्णालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली हाेती.