---Advertisement---
बोदवड

धक्कादायक : बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । बोदवड तालुक्यातील बेपत्ता असलेल्या तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळून आला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तरुणाने आत्महत्या केली की अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला याबाबत अद्याप उगड होवू शकले नाही. याबाबत बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime 5 jpg webp

अजय सुरेश माळी (वय २०) असे मयत तरुणाचे नाव आहे. बोदवड शहरातील दत्त कॉलनीतील रहिवासी असेले सुरेश सखाराम माळी (५१) यांचा मुलगा अजय हा रविवारी रात्री ८.३० वाजता घरातून काही एक न सांगता निघून गेला होता. त अजयचा फोन लागत नसल्याने शोधा शोध करू लागले सापळत नसल्याने वडील सुरेश माळी यांनी बोदवड पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची नोंद केली. होती मात्र रुपनगरातील प्रभाग क्रमांक तीनमधील खाटीक समाज मंदिराजवळील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बोदवड ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तर बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक युनूस तडवी करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---