धकाकदायक : जुन्या वादातून तरुणासह पत्नी व आईला मारहाण

जळगाव लाईव्ह न्युज । २८ मे २०२२ । जळगाव शहरात एका जुन्या वादामुळे तरुणासह पत्नी व आईला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पिंप्राळा परिसरातील सिद्धार्थनगरमध्ये हि घटना घडली. यावेळी तिघांना दगडाने मारहाण करण्यात आली. रामानंदनगर पोलिसात याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धार्थ नगरात शुभम संजय पवार हा तरुण आई व पत्नी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. याच परिसरात राहणारे विक्की रवींद्र बाविस्कर याच्यासह चार जणांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास जुन्या वादातून शुभम त्याची पत्नी व आईला शिवीगाळ करत त्यांनी मारहाण केली यादरम्यान एकाने शुभम याच्या आईच्या कपाळावर दगड मारून दुखापत केली तसेच चाकुने फाडून टाकेल अशी धमकी दिली. या घटनेत शुभम ची आई वर्षा संजय पवार या जखमी झाल्या आहेत.

याप्रकरणी शुभमच्या तक्रारीवरून विक्की रवींद्र बाविस्कर ,राजू वसंत निकम, आकाश रवींद्र बाविस्कर व उषा रवींद्र बाविस्कर या एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राजेश चव्हाण हे करीत आहेत.