जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगरातील एका अल्पवयीन मुलीने काही तरी विषारी औषध सेवन केल्यामुळे तिच्या मृत्यू झाला आहे. दरम्यान, तिला जळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता. ती अडीच महिन्याची गर्भवती असल्याचे धक्कादायक प्रकार उघडीस आला. मात्र, मयत मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार देण्यास नकार दिला आहे.
मुक्ताईनगरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन केल्यामुळे तिच्या मृत्यू झाला. तिच्या कुंबीयांनी तिला जळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ती मयत मुलगी अडीच महिन्याची गर्भवती असल्याने तिच्यावर कुणी तरी अत्याचार केल्याचे उघडीस आले. याबाबत मयत मुलीच्या कुटुंबियांना विचारणा केली परंतु, त्यांनी याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले.
या प्रकरणी पोलिसांतर्फे बालकल्याण समितीला पत्रक पाठवण्यात आले. त्यानुसार सदर घटनेचा मुक्ताईनगर पोलिसांत नोंद करून घेतली आहे. पुढील तपास राहुल बोरेकर करीत आहेत.