जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । सध्या लूट मारीचे प्रमाण वाढले असून भरदिवसाही लूट होत आहे, लंघूशंकेसाठी रस्त्यावर थांबलेल्या दाम्पत्याला सात ते आठ भामट्यांनी जंगलात नेवून मारहाण केली व विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि रोकड जबरीने लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे.
पंकज रामसिंग राठोड (वय २१, रा. जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. राठोड हे आपल्या पत्नीसह मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील कालिंका माता मंदीराच्या पुढे बुधवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रस्त्याने जात होते. दरम्यान, दोघे दाम्पत्य लघुशंकेसाठी थांबले. त्याचवेळी बहादू, तोरे, आणि प्रताप याच्यासह इतर ७ अनोळखी येवून सदर दाम्पत्याला जंगलात नेवून बेदम मारहाण केली. तसेच राठोड यांच्या पत्नी सपना यांच्या आंगावरील दागिने व बाराशे रूपयांची रोकड असा एकुण ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाला जबरी चोरून नेला. या प्रकरणी दाम्पत्याने मुक्ताईनगर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सात संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.