जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । प्रतिकुल परीस्थितीत संघर्ष करणार्या एका कुटुंबाने आपल्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीची भुसावळातील एका दाम्पत्याला घर काम करण्यासाठी 50 हजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी दाम्पत्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चिमुकलीच्या माता-पित्यांविरोधातही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आली आहे. बालिकेची जळगावातील बाल वसतिगृहात रवानगी करण्यात आली.
भुसावळातील अठवाणी दाम्पत्याने घर काम करण्यासाठी नाशिकमधील एका कुटुंबातील बालिकेला 50 हजार रुपये देवून शहरात आणले होते. मात्र. कुटुंबातील सदस्य घर काम करण्यासाठी बालिकेच सातत्याने अमानुष छळ करीत मारहाण करीत होते. मात्र. बालिका निमूटपणे हा अत्याचार सहन करीत राहिली. बालिकेची घरची परीस्थिती जेमतेम असल्याने बालिकेने हा सर्व प्रकार आतापर्यंत सहन केला.
पीडीते बालिकेने नुकतीच आपल्या आई-वडलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता राधा अठवाणी यांनी मनाई केली तर शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजी स्नानगृह स्वच्छ न केल्याने राधा अठवाणी यांनी अमानुष मारहाण केली व पीडीतेशी कशीबशी सुटका करून घेत घरातून पळ काढला. पीडीतेने या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेवून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर रात्री उशिरा भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर नरेश अठवाणी आणि राधा अठवाणी (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) यांच्याविरूध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस उपनिरीक्षक हरीष भोये हे करत आहेत.