धक्कादायक.. १८ वर्षीय युवतीने गळफास घेत संपवली जीवनयात्रा!
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । भुसावळ येथून जवळच असलेल्या कंडारी ग्राम पंचायतीच्या क्षेत्रातील गोलाणी परिसरातील रहिवासी असलेल्या 18 वर्षीय युवततीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. याबाबत बाजरी पेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निकीता नंदू कोळी (18) असे मयताचे नाव आहे. ती कंडारी ग्रामपंचायतीच्या सदस्य शारदा नंदू कोळी यांची कन्या आहे. निकीता कोळी या युवतीने गुरुवारी रोजी दुपारी घरी कोणी नसतांना राहत्या घरात ओढणीने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, प्रशांत लाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ट्रामा केअर सेंटरमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. निकीताने महाविद्यालयाच्या दुसर्या वर्षाची परीक्षा दिली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुरूवारी निकीता हिच्या भावाचा वाढदिवस असल्याचे सांगण्यात आले.