धक्कादायक : फुटबॉल सामन्यादरम्यान १२७ जणांचा मृत्यू तर १८० लोक गंभीर जखमी
भारताचा शेजारी राष्ट्र असलेल्या इंडोनेशियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे फुटबॉल सामन्यादरम्यान १२७ जणांचा मृत्यू झाला असून, १८० लोक गंभीर जखमी झाले आहेत. इंडोनेशियाातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.
अधिक माहिती अशी कि, अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यादरम्यान सामना रंगला होता.यावेळी पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर ३-२ ने मात केली. पराभूत अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. यावेळी नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी आश्रू धुराच्या कांड्याचा मारा केला.
त्यामुळे मैदानातील चाहत्यांमध्ये धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत १२७ जणांच्या मृत्यू झाला. तर, अनेक गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.