जळगाव लाईव्ह न्यूज | ६ नोव्हेंबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात 151 ग्राम पंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडल्यानंतर आज सोमवारी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन,मंत्री अनिल पाटील आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. हाती आलेल्या निकालानुसार, मुक्ताईनगर तालुक्यात एकनाथ खडसेंना धक्का बसला असून तालुक्यातील 4 पैकी 3 जागांवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. जामनेर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीपैकी 12 ग्रामपंचायतीवर भाजपाने बाजी मारली आहे. तर जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटलांनी गड राखत 32 पैकी 28 जागांवर बाजी मारली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात खडसेंना धक्का
मुक्ताईनगर तालुक्यातील चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या मंदाकिनी कोळी, वडवे ग्रामपंचायतवर शिंदे गटाचे शिवराम कोळी, चिखली ग्रामपंचायत वर शिंदे गटाचे वैभव पाटील सरपंच पदी विराजमान झाले असून पिंपरी नांदू – ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसे समर्थक प्रतिभा अशोक पाटील सरपंच पदी विराजमान झाले आहेत.
जामनेर तालुक्यातील 17 ग्रामपंचायती पैकी 12 ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
टाकळी बुद्रुक – वंदनाबाई भाऊराव मोरे
गारखेडा खुर्द – मंगलाबाई माधव महाजन
शहापूर – जितेंद्र बाबुराव पाटील
कापूसवाडी – महेंद्रसिंग नाईक
तोरनाळे – अंजना ईश्वर राम पाटील
खडकी – रजनी रमेश नाईक
शिंगायत – अनिता जाधव
गारखेडा – मंगलाबाई माधव महाजन
सावतखेडा – शांताबाई कडू बिल्लोर
दोंदवाडे – सुभाष त्रंबक पाटील
नांद्राहवेली – नितीन रामचंद्र पाटील
पडाडतांडा – रेणुकाबाई गरुड राठोड
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गड राखला
जळगाव ग्रामीण मतदारसंघात 32 पैकी 28 जागांवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे. तर पाळधी या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मूळगावी वर्चस्व कायम दिसून आले. विजय रूपसिंग पाटील पाळधी या गावी गुलाबराव पाटील यांचे समर्थक सरपंचपदी विराजमान झाले. यावल तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. 11 पैकी 5 जागा जिंकल्या आहेत. भाजपा 3, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, अपक्ष प्रत्येकी एक विजयी उमेदवार विजयी झाले आहे.
अमळनेर तालुक्यातील 17 पैकी 14 ग्रामपंचायतवर अजित पवार गटाचा झेंडा
अमळनेर तालुक्यात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे पाहायला मिळाले. अमळनेर तालुक्यातील 17 पैकी 14 ग्रामपंचायतवर अजित पवार गटाचा झेंडा फडकला असून दोन ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला आहे तर शरद पवार गटाला मात्र एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान विजयानंतर मंत्री अनिल पाटील यांच्या समवेत विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला आहे