केसीई अभियांत्रिक महाविद्यालयात “शिवस्वराज्य दिन” सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । केसीई अभियांत्रिक महाविद्यालयात “शिवस्वराज्य दिन” हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या उत्साहपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले.
कार्यक्रमानिमित्त गड किल्यांचे छायाचित्र प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली’. त्याशिवाय विद्यार्थ्यांनी पोवाडा तसेच भाषणातून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याव्यतिरिक्त सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थीनींद्वारे सामाजिक संदेश देणारी शिवज्योत रॅली काढण्यात आली. गडकिल्ले छायाछ्त्र प्रदर्शन या स्पर्धेमध्ये निखिल ठाकरे आणि पुष्पक अत्तरदे यांनी प्रथम पारितोषोक तसेच श्वेता चौधरी आणि दीपाली श्रीवास्तव यांनी द्वितीय पारितोषिक मिळविले.
या कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. लीना वाघुळदे, कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, प्रा. संजय दहाड, प्रा.डॉ. प्रज्ञा विखार व सर्व विभाग प्रमुखांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. याशिवाय विद्यार्थ्यांमधून दीपक पुरकर, नचिकेत सोळंके, सागर परदेशी , निखिल सुतार, भावेश रोटे, अपूर्व वाणी ,अभिजित पाटील आणि जयेश महाजन यांनी मोलाचे योगदान दिले.