आमदार सुरेश भोळे यांच्या माध्यमातून जळगावात शिवपुरान कथेला सुरुवात
जळगाव लाईव्ह न्यूज । श्री राधाराणी सेवा समिती आणि आमदार राजूमामा भोळे यांचे सहकार्याने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जळगाव शहरात डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेला दि. १६ ते २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत खान्देश सेंट्रल येथील मैदानात सुरुवात झाली आहे. भाविकांनी कथाश्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. राजूमामा भोळे यांनी केले आहे. सकाळी ९ वाजता गोलाणी मार्केट येथून कलश यात्रा भाविकांच्या उत्साहात काढण्यात आली.
प. पू. इंद्रदेवेश्वरानंद गुरुजींना राष्ट्रीय स्तरावर यज्ञपिठाधीश्वर धर्मसम्राट विद्यावाचस्पती श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. इंद्रदेवेश्वरानंद महाराज यांचे अनमोल प्रवचन जळगाव शहरवासीयांना ऐकायला मिळणार आहे. या अद्भुत पर्वणीवर जळगावकरांना उपस्थित राहून कथा श्रवण करण्याची संधी मिळत आहे. सकाळी ९ वाजता गोलाणी मार्केट येथून कलशयात्रा आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. महिला भाविकांनी डोक्यावर मंगल कलश घेऊन व पारंपरिक पेहराव करून भगवान महादेवाचा जयघोष केला.
कलशयात्रा हि गोलाणी मार्केट येथून कथास्थळी खान्देश सेंट्रल येथील मैदानात समाप्त झाली. यानंतर डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला. पहिल्यादिवशी महाराजांनी भगवान शिव महिमा सांगितला. तसेच, महादेव भक्तीची महती सांगितली. प्रसंगी शहरातील अनेक कानाकोपऱ्यातून भाविकांनी उपस्थिती दिली होती.