---Advertisement---
विशेष जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या नाराज आमदारांचे आहे ‘जळगाव कनेक्शन’!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२२ । विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. अशातच शिवसेनेचे वजनदार नेते एकनाथ शिंदे हे त्यांच्या ११ समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल झाले आहेत. गुजरातमधील सूरतमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे ११ आमदारांसह मुक्कामी असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच, शिंदे यांचा मुक्काम असलेल्या मेरिडियन हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिंदे यांच्यासह सर्व ११ आमदारांची व्यवस्था करण्यासह त्यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी मुळ जळगाव जिल्ह्यातील एक बड्या नेत्याकडे सोपविण्यात आली आहे.

Jalgaon Connection jpg webp

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि गुजरात भाजपचा एक मोठा नेता यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीनंतर हा भाजप नेता अहमदाबादच्या दिशेने रवाना झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत ही भेट झाली असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. याला खुद्द शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिदेत दिला आहे. सी.आर.पाटील यांच्याकडे शिवसेनेच्या नाराज आमदारांची व्यवस्था करण्यासह एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन पुढील रणणीती ठरविण्याची जबाबदारी दिली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

---Advertisement---

हेही वाचा : Eknath Shinde Updates : शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील आहेत कुठे, मुंबई का गुजरात?

सी.आर.पाटील हे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष असून नेत नवसारीचे खासदार देखील आहेत. ते मुळ जळगावचे असून त्यांचा जळगाव शहरात डी मार्ट जवळ मोठा बंगला आहे. पाटील यांची गणना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तियांमध्ये होते. यामुळे त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना झाले असल्याने ठाकरे सरकार पाडण्याच्या हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---