जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जून २०२१ । पाचोरा तालुक्यालातील शेतकऱ्याचे पंप चे वाढीव वीजबिल आणि सक्तीची वसुली याच्या विरोधात पाचोरा – भडगाव तालुक्याचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आज सोमवारी पाचोरा शहरातील स्थित गिरड रोड वरील महावितरण कार्यालयात टाळा ठोको आंदोलन केले यात सर्व शिव सैनिक शिव सेना पदाधिकारी याच्या सोबत आघाडीवर आमदार किशोर आप्पा पाटील हे होते.
विज वितरण कंपनीने मागील बिलांच्या २५ टक्के वसुली करण्यासाठी सन – २०२२ ची मुदत दिलेली असतांना अधिकाऱ्यांच्या आदेशावरून कर्मचारी शेतकऱ्यांकडून बळजबरीने विज बिल वसुली करत आहेत. एका रोहित्र वरील काही शेतकऱ्यांनी पैसे भरलेले असतांना कंपनीचे कर्मचारी त्या रोहित्रावरील संपुर्ण शेतकऱ्यांचे विज कनेक्शन बंद करत आहेत. रोहित्र जळाले किंवा त्यात बिघाड झाल्यानंतर केवळ ८ तासात बसविण्याचे परिपत्रक असतांना अधिकारी व कर्मचारी त्या पोटी मोठी वसुली करुन एक ते दिड महिन्यात नविन रोहित्र बसविणे अथवा नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करतात. पाचोरा तालुका आवर्शन प्रवर्शन मध्ये असतांना पाचोरा मतदार संघातील केवळ १० ते १५ टक्के शेतकऱ्यांच्या विहीरींना पाणी असल्याने ते शेतकरी मे महिन्यात कापसाची लागवड करतात. मात्र विज वितरण कंपनीच्या आळमुठेपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
यामुळे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा व भडगाव तालुक्यातील २५ कार्यालयात एकाच वेळी सकाळी ११ वाजता कुलुप ठोकण्यात आले. कार्यालयांना टाळे लावल्यानंतर आमदार किशोर पाटील यांचेसह २५ ते ३० कार्यकर्त्यांना अटक करुन पोलिस व्हॅनमध्ये नेण्यात आले. ६८ कलमानुसार गुन्हे दाखल करुन ६९ कलमानुसार सोडण्यात आले. टाळे ठोको आंदोलना प्रसंगी ५ अधिकाऱ्यांसह पाचोरा, पहुर, जामनेर येथील १०० पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
आमदार किशोर पाटील यांनी १ जुन रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन शेतकऱ्यांचे विज वितरण कंपनी करत असलेला छळ न थांबविल्यास ५ जुन नंतर पाचोरा मतदार संघातील सर्व विज वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र ६ जुनला रविवार ची सुट्टी असल्याने अखेर सोमवारी आमदार किशोर पाटील यांनी स्वतः उपस्थित राहुन पाचोरा येथील गिरड रोड वरील कार्यकारी अभियंता श्याम दासकर यांच्या कार्यालयाला कुलुप ठोकले. याच वेळी पाचोरा शहरातील भाग – १ चे उप कार्यकारी अभियंता आसित राठोड, भाग – २ रविंद्र शिरसाठ, भडगाव येथील अजय धामोरे, नगरदेवळा येथील पुरुषोत्तम बोरनारे यांचे सह दोन्ही तालुक्यातील ५ मुख्य कार्यालय व १९ उप केंद्रास सकाळी ११ वाजता कुलुप लावण्यात आले. पाचोरा शहरातील गिरड रोड वरील मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टाळे ठोको आंदोलना वेळी नगराध्यक्ष संजय गोहील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, बाजार समितीचे प्रशासक चंद्रकांत धनवडे, नगरसेवक राम केसवानी, शितल सोमवंशी, दत्ता जडे, बापु हटकर, आनंद पगारे, गणेश पाटील, प्रविण ब्राम्हणे, सुनिल महाजन, जितेंद्र पेंढारकर, सुमित सावंत, गजु पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाचोरा येथे राज्यातील पहिलेच टाळे ठोको आंदोलन यशस्वी झाल्यानंतर याचे पडसाद राज्यभर उमटणार असल्याचे भाकीत वर्तविले जात आहे. मुख्य कार्यकारी अभियंता श्याम दासकर यांच्या कार्यालयास कुलुप ठोकण्याच्या १५ मिनिटे अगोदर मुख्य कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढुन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे कुलुप लावुन घेतले होते. त्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी ११ वाजता कुलुप लावले. यावेळी पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौबे, विकास पाटील, जळगांव येथील एस. आय. डी. च्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी पाटील, विजय जाधव, नितीन सुर्यवंशी, यशवंत घोडसे, राहुल बेहरे, राहुल सोनवणे, अजय मालचे, किरण पाटील सह होमगार्ड बंदोबस्तासाठी उपस्थित होते.