भुसावळ

भुसावळात शिवसेनेतर्फे ५० रक्तदात्यांचा सन्मान!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । रक्तदाता हा रुग्णांसाठी जीवनदाता असून रुग्ण व उपचार यामधील अमृतासारखा महत्वाचा संजीवनी देणारा देवदूत आहे. भुसावळातील तरुणांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. देशसेवेच्या या कार्यामुळे समाजातील इतर तरुणांसमोर त्यांनी एक आदर्श निर्माण केला असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी शिवसेनेतर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या रक्तदात्यांच्या सन्मान सोहळ्यात केले.

रक्तदात्यांमुळे अनेकांना जीवनदान मिळाले आहे. अनेक वेळा रक्तदाते स्वखर्चाने रुग्णापर्यंत पोहोचून त्यांनी अनेकांचे प्राण वाचविले आहेत. त्यांचे कार्य हे अनमोल असून त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप म्हणून आणि त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण तत्वानुसार परीसरातील 50 रक्तदात्यांचा सन्मान आयोजित केला असल्याचे संयोजक उमाकांत शर्मा यांनी समारोपाप्रसंगी सांगितले. सूत्रसंचालन तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा सह समन्वयक उत्तमराव सुरवाडे, उपजिल्हा संगठक विलास मुळे, तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश महाजन, विधानसभा क्षेत्र संगठक बबलू बर्‍हाटे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, शिवसेना शहरप्रमुख हेमंत खंबायत, दीपक धांडे, संतोष माळी, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, रेल कामगार सेना मंडल अध्यक्ष ललितकुमार मुथा, शहर संगठक योगेश बागुल, उपशहर प्रमुख धनराज ठाकुर, स्वप्नील सावड़े, जवाहर गौर, सोनी ठाकुर, बाळासाहेब भोई, सागर विसपुते, राहुल सोनवणे, कैलास अग्रवाल, आदित्य शर्मा, पूजन महाजन, सौरभ शर्मा, कडू पाटील, यश अग्रवाल, संजय ठाकुर, शिवम चौरसिया, राजू इंगले, धीरज वरदोनकर, प्रसिद्धीप्रमुख गोकुळ बाविस्कर, अमोल भालेराव आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button