⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Recording Viral : काय ते शिवसैनिक, काय ते आबासाहेब, काय ते गुलाबभाऊ.. सर्वच ओक्केमदी नाय.. ऐका रेकॉर्डिंग

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । राज्यातील सत्तांतर नाट्य आटोपल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिवसेना आमदार स्वगृही परतले आहे. बंडखोर आमदारांवर जनतेतून टीका होत आहे तर काही कार्यकर्ते समर्थन देखील करीत आहेत. शिवसेनेतील फूटच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत असून त्यात एका शिवसैनिकाने आमदाराशी संवाद साधला आहे. शिवसैनिक ते आबासाहेब मार्गे गुलाबभाऊ व्हाया उद्धव साहेब अशी चर्चा असलेल्या या रेकॉर्डिंगची ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ कोणतीही पुष्टी करीत नाही.

राज्यातील घडामोडी जवळपास आटोपल्या असून बंडखोर आमदारांवर अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर दि.११ जुलै रोजी कामकाज होणार असून त्यानंतर शिंदे सरकरचे गाडे पुढे सरकणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करीत बाहेर पडलेले राज्यातील सर्व आमदार तब्बल १३ दिवसांनी सुरत, अहमदाबाद, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा प्रवास करून स्वगृही परतले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर नाराज होऊन एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांमध्ये देखील एकमत नसल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मिडियात एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत असून त्यावरून हे दिसून येते.

जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मते व्हायरल होत असलेली रेकॉर्डिंग आ.चिमणराव पाटील यांची आणि एका शिवसेना पदाधिकाऱ्याची आहे. आ.चिमणराव पाटील आणि आ.गुलाबराव पाटील यांच्यातील शीतयुद्धाला पुन्हा हवा देण्यासाठी मुद्दाम हा खोडसाळपणा करण्यात आल्याचे काही कार्यकर्ते सांगतात. अदयाप दोन्ही नेत्यांपैकी कुणीही या क्लीपबाबत आपले मत व्यक्त केलेले नाही.
ऐका संपूर्ण ऑडिओ क्लीप :