शिंदे गटाच्या बंडखोर नगरसेवकांनी वाचवल ठाकरे गटाच्या बंडखोरांच नगरसेवक पद
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये उभी फूट निर्माण झाली आहे. त्याच प्रकारची फूट जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये ही पाहायला मिळत आहे. मात्र जळगाव मनपा मध्ये शिंदे गटातील नगरसेवकांमुळे शिवसेनेमध्ये असलेल्या फुटीर नगरसेवकांच पद वाचलं आहे.
तर झालं असं की, दीड वर्षांपूर्वी महानगरपालिकेमध्ये अभूतपूर्व अस सत्ता परिवर्तन झालं. या सत्ता परिवर्तनावेळी भारतीय जनता पक्षातून बंडखोरी करत नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. किंबहुना प्रवेश न करता शिवसेनेचा महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांना आपलं मत दिलं. यामुळे त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष नाराज झाला होता. शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून भारतीय जनता पक्षा सोबत युती केली यामुळे या सर्व बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी भारतीय जनता पक्षातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नेते उत्सुक होते.
मात्र यात गंमत अशी की, शिंदे बाहेर पडल्या पडल्या शिवसेनेतला बंडखोरांनी अजून बंडखोरी केली आणि शिंदें सोबत जाऊन आपल्या समर्थन एकनाथ शिंदेंना दिलं. यामुळे आता शिवसेनेच्या बंडखोर मध्ये देखील दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. अशावेळी शिंदे गटातील नगरसेवकांना वगळता इतर सर्व शिवसेनेत असलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी पुढे येत होती.
सरते शेवटी जर अपात्र करायचा असेल तर सर्व नगरसेवकांना करावा लागेल यासाठी शिंदे गटातील बंडखोर नगरसेवकांमुळे इतर बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्यात आता अडचण येत आहे. यामुळे शिंदे गटातील नगरसेवकांमुळे सर्वच बंडखोर नगरसेवक अपात्र त्याच्या कारवाई पासून लांब राहिले किंबहुना बचावले गेले.