⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला मिळणार केवळ 48 जागा !

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२३ । भाजपच्या सोशल मीडिया सेल आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची नुकतीच कार्यशाळा मुंबई येथे पार पडली. या कार्यशाळेचा समारोप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाषणाने झाला. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाकडे 50च्या वर कोणीच नाहीये यामुळे भाजप 240 जागा लढवणार तर शिंदे गट केवळ 48 जागा लढवणार असा गौप्यस्पोट केला.

आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 240 जागा लढवणार शिंदे गट 48 जागा लढणार असे ते म्हणाले.

यावेळी चंद्रशेखर बावळगुळे म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुकीवेळी 150 ते 170 जागा निवडून येतील यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे. आपण 240 जागा लढवण्याचा विचारात आहोत. कारण शिंदेचे पन्नासच आहेत 50 सोडल्यास त्यांच्याकडे कोणी नाही.

अश्या वेळी १४० जागा लढवयाच्या तर अशावेळी तुम्हाला तीम अलर्ट करावे लागतील. तुम्हाला खूप काम आहे. तुम्हाला रात्र रात्र जागुन तुम्हाला काम करावं लागणार आहे. याची तुम्हाला मानसिक तयारी करायला हवी. डिसेंबर ते पुढचा काळ तुम्हाला रात्रभर जागण्याचा काळ आहे. त्या काळात आपल्याला प्रशिक्षित टीम लागेल. तोपर्यंत तुम्हाला संपर्क निर्माण करावा लागते. असेही ते म्हणाले.