शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? वाचा काय आहे??

ऑक्टोबर 20, 2022 12:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. दोन्ही गटातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटात आणि शिंदे गटात शिवसैनिकांचे इनकमिंग सुरू आहे. अशातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

udhav thakre eknath shinde jpg webp

तो म्हणजे दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सूचक वक्तव्ये केल्याने त्या कोणत्या नवीन गटात सामील होणार यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या दिपाली सय्यद मागच्या काही दिवसांपासून अचानक शांत झाल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, सय्यद ह्या विरोधकांवर जाहीर टीका करत असल्याने त्यांच्यावर टीका व्हायच्या यामुळे त्या नेहमी सक्रीय शिवसेनेची बाजू मांडायच्या यावर त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, शिवसेनेत काम करताना मला आता साडेतीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. मी कामंही केली पाहिजेत. जी लोक कामं करतात त्यांना पाठिंबा दिला तरच ती पूर्ण होतात. असे त्या म्हणाल्या यावरून त्यांचा अप्रत्यक्ष कोणावर रोष आहे हे दिसून येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now