जिल्हा परिषद/पंचायत समिती असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी शेखर पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । श्री छत्रपती शाहू महाराज सभागृह जिप जळगाव येथे राज्याचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉ निलम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत जळगांव जिल्हा कार्यकारिणी तथा तालुका अध्यक्षांची निवड जिल्हाध्यक्ष यांचे तर्फे जाहीर करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणीत प्रमुख सल्लागार म्हणून जिप अध्यक्ष रंजना प्रल्हाद पाटील यांचेसह शिवसेना गटनेते तथा जिप सदस्य नाना महाजन इतर जिल्हा परिषय सदस्यांत पवन सोनवणे,सुरेखा पाटील,हिंमत पाटील, पल्लवी सावकारे,नंदा सपकाळे, कैलास सरोदे,अनिता गवळे, गजेंद्र सोनवणे, प्रभाकर सोनवणे (मोहाडी), सरोजिनी गरुड,सौ माधुरी अत्तरदे, प्रमिला पाटील,अनिल देशमुख,दिलिप पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे,मा.जिप सदस्य आर.जी.नाना पाटील वगैरे जि .प. व पं.स.सदस्यांत प्रतिभा बोरोले रावेर,प्रविण पाटील अमळनेर, अशोक पाटील पारोळा, अनिल महाजन एरंडोल,अमर पाटील जामनेर, सुभाष पाटील पाचोरा, रामकृष्ण पाटील भडगाव, शिवाजी सोनवणे चाळीसगांव यांची उपस्थिती होती.
दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असोसिएशन यावल तालुका अध्यक्षपदी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांची निवड करण्यात आली , या निवडी बद्दल त्यांचे असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी , काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , नईम शेख , काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, विक्की पाटील , कोरपावली सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पटेल , सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल, धिरज कुरकुरे, कोरपावलीचे सामाजीक कार्यकर्त मुक्तार पटेल , रमेश पाटील , अभ्य महाजन आदींनी त्यांचे शुभेच्छा देवुन अभीनंदन केले आहे.