⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | वाणिज्य | शेअर बाजाराची घोडदौड सुरूच ! सेन्सेक्सने गाठला नवीन विक्रमी उच्चांक

शेअर बाजाराची घोडदौड सुरूच ! सेन्सेक्सने गाठला नवीन विक्रमी उच्चांक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२३ । भारतीय शेअर बाजाराची घोडदौड सुरूच असून चौफेर खरेदीमुळे शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक तेजी आहे. आज सकाळीच बाजार खुलताच सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येतेय. आज सकाळी सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सकाळी 10.30 वाजेपर्यंत BSE सेन्सेक्स 66049 आणि निफ्टी 19,566 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. बाजाराच्या गतीमध्ये आयटी आणि धातूचे समभाग आघाडीवर आहेत.

TCS मध्ये जोरदार वाढ
यानंतर TCS चा शेअर 2% पेक्षा जास्त वर चढला आहे, जो निफ्टी मध्ये देखील टॉप गेनर आहे. त्याचप्रमाणे हिंदाल्कोच्या शेअरमध्ये 2.2% ने वाढ होत आहे. पॉवरग्रीड आणि मारुतीचे शेअर्स टॉप लूसर आहेत. काल म्हणजेच १२ जुलै रोजी भारतीय बाजार बंद झाले होते. BSE सेन्सेक्स 223 अंकांनी घसरून 65,393 वर बंद झाला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.