⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

खुशखबर! गॅस सिलिंडरच्या दरात कपात, आजपासून नवे दर लागू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२४ । सध्या संपूर्ण देशात सध्या निवडणुकीची धामधूम असून दोन टप्प्यातील मतदानही पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी होणार आहे. अशातच घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Cylinder Price) स्वस्त झाला आहे.

तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. त्यानुसार, एलपीजी सिलिंडर आजपासून १९ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, हे बदल केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झाले आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशावर या महिन्यात ताण येणार नाही, इतके मात्र नक्की.

तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्याकिमतीत कोणताही बदल केलेला नाही. जळगावसह मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. यापूर्वी १ एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३० रुपयांची कपात करण्यात आली होती. जळगावात सध्या १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ८०८.५० रुपये इतकी आहे.

आता तेल कंपन्यांनी पुन्हा १९ रुपयांची कपात केल्यानंतर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १६९८.५० रुपयांवर आला आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७४५.५० रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये १९११ रुपयांना मिळणार आहे. आजपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.