जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । जागतिक बाजारातील वाईट संकेतांनंतर आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) मोठ्या घसरणीसह उघडला आहे. व्यवहाराच्या सुरुवातीला 30 अंकांनी घसरला होता. त्यानतंर सकाळी ११ वाजेनंतर सेन्सेक्स (Sensex)७४५ अंकांनी घसरून 55 हजारांच्या खाली आला आहे. तर दुसरीकडे निफ्टी (Nifti) २११ अंकांनी घसरली आहे.
सकाळी व्यवहाराच्या सुरुवातीला देशांतर्गत शेअर बाजार लाल चिन्हाने उघडला आहे. ११ वाजेपर्यंत सेन्सेक्स ७४५ अंकाने घसरून ५४,५७५.१३ इतक्या पातळीवर पोहोचला आहे. त्याच वेळी निफ्टी १६,२६७.१०पातळीवर आला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर लाल चिन्हांसह व्यवहार करताना दिसले.
अमेरिकन बाजारात मोठी घसरण
दुसरीकडे, जागतिक बाजारातून खूप वाईट सिग्नल आहेत. अमेरिकन बाजारात मोठी घसरण आहे. डाऊ जोन्स दिवसाच्या नीचांकी पातळीवर 640 अंकांनी घसरून बंद झाला. या व्यतिरिक्त, S&P 500 2.5 टक्क्यांपर्यंत घसरला आणि Nasdaq 2.75% ने खाली आला. अमेरिकेत मे महिन्यात चलनवाढीचा दर ८.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
गुरुवारी शेअर बाजाराची स्थिती
याआधी गुरुवारी, गेल्या चार व्यापार सत्रातील शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड संपुष्टात आला आणि तो हिरव्या चिन्हासह बंद झाला. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 427.79 अंकांनी वर चढत 55,320.28 अंकांवर पोहोचला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 121.85 अंकांच्या वाढीसह 16,478.10 वर बंद झाला.