⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

तेजीनंतर शेअर बाजार पुन्हा घसरला, आज सेन्सेक्ससह निफ्टी किती घसरली?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२३ । काही काही दिवसापासून शेअर बाजारात तेजी दिसून आली. मात्र आज या तेजीला ब्रेक लागला आहे. भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी आज लाल चिन्हात बंद झाले आहे.

आज व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 161.41 अंकांनी म्हणजेच 0.26 टक्क्यांनी घसरून 61,193.30 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 57.80 अंकांच्या किंवा 0.32 टक्क्यांच्या घसरणीसह 18,089.85 च्या पातळीवर बंद झाला. परदेशी बाजारातही नरमाईचा कल दिसून आला आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये काहीशी मजबूती आली आहे. मंगळवारच्या 81.88 च्या बंदच्या तुलनेत रुपया आज 0.07 टक्क्यांनी वाढून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 81.82 वर बंद झाला. रुपया 81.77 वर उघडला आणि अनुक्रमे 81.76 आणि उच्च 81.86 वर पोहोचला.