शनिवार, डिसेंबर 2, 2023

शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ! सेन्सेक्स, निफ्टीने तोडले आतापर्यंत सर्व रेकॉर्ड

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी आली असून सेन्सेक्ससह निफ्टीने आज आपले सर्व जुने रेकॉर्ड तोडले आहेत. आज सेन्सेक्सने नवीन विक्रमी पातळी गाठली असून, त्यानंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत बंपर वाढ झाली आहे. Share Market News Update

आज शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता व्यवहार संपण्यापूर्वी सेन्सेक्स 803.14 अंकांनी म्हणजेच 1.26 टक्क्यांनी वाढून 64,718.56 च्या विक्रमी पातळीवर पोहोचला. याशिवाय निफ्टीनेही आज बाजारात नवा उच्चांक गाठला आहे.

निफ्टी आज 216.95 अंकांच्या म्हणजेच 1.14 टक्क्यांच्या वाढीसह 19,189.05 च्या पातळीवर बंद झाला. जुलै महिना सुरू होण्यापूर्वीच सेन्सेक्स-निफ्टीने बाजारात एक नवा विक्रम केला आहे.

आजच्या वाढीनंतर सेन्सेक्सचे मार्केट कॅप 295.72 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. दरम्यान, आज ICICI बँक आणि NTPC चे शेअर लाल चिन्हात बंद झाले आहेत. याशिवाय सर्व शेअर मध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे.

कोणत्या शेअरना गती मिळाली?
आज M&M चे शेअर 4 टक्क्यांच्या वाढीसह विक्रमी पातळीवर आहेत. याशिवाय इन्फोसिस, इंडसइंड बँक, सन फार्मा, टीसीएस, मारुती, एल अँड टी, टेक महिंद्रा, विप्रो, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टाटा मोटर्स, रिलायन्स, भारती एअरटेल, यासह अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली आहे. एसबीआय, त्यानंतर हे सर्व स्टॉक हिरव्या चिन्हात बंद झाले आहेत.