खा.शरद पवारांचे कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत
ढोल ताशे, पुष्पवृष्टी आणि घोषणाबाजीने परिसर दणाणला
जळगाव लाईव्ह न्यूज | १५ एप्रिल २०२२ ।
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळावर आगमन झाले यानंतर खा.शरद पवार हे आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ आले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. ढोल ताशे, पुष्पवृष्टी आणि घोषणाबाजीने परिसर दणाणला होता. तसेच तब्बल तीन क्विंटल च्या हार ने खा. पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
खासदार शरद पवार हे आज दि १५ परील रोजी एक दिवसीय जिल्हा दौर्यावर जळगावात दाखल झाले. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी धरणगाव कडे प्रस्थान केले. चांदसर येथे दिवंगत माजी आमदार मुरलीधरअण्णा पवार यांच्या पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तदनंतर दुपारी ४ वाजता शिवतीर्थ मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या लोकसंघर्ष मोर्च्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, खासदार शरद पवार यांच्या सोबत आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सार्वजनीक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणे, जैन समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, जिल्हा राष्ट्रवादीचे निरिक्षक अविनाश आदीक, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आदींसह अन्य मान्यवर देखील चांदसर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.