जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । एका शाळेत १३ वर्षीय अल्पवयीन विध्यार्थीनीचे ११ वीतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांने आक्षेपार्ह फोटो काढून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सांगवी ता.यावल येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून पोस्को अन्वये गुन्हा झाला आहे.
तालुक्यातील सांगवी बुद्रुक शाळेतील विद्यार्थिनीच्या फिरदीवरून ती मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शाळेच्या पायरीवर बसलेली असताना डोंगर काठावरील दोन ११ वीतील विध्यार्थी तेथे आले. व तिचा आक्षेपार्ह फोटो काढत विनयभंग केला. हा प्रकार विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांना सांगितला असता त्यांनी मोबाईल मधील फोटो डिलीट केले. मात्र, विध्यार्थीनीच्या नातेवाईकांनी याबाबत यावल पोलिसांत तक्रार दिली आहे. पुढील तपास सहा, निरीक्षक पठाण करीत आहे.