---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

तरुणीची काढली छेड, आरटीओ कार्यालयातील लिपीकविरुद्ध गुन्हा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील एका २७ वर्षीय तरुणीला रस्त्यात अडवून तिची छेड काढल्याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील लिपीकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

images 1 4 jpeg webp

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक तरुणी दि.१२ रोजी रात्री काम आटोपून घरी जात होती. महाबळ परिसरात पायी जात असताना चारचाकी क्रमांक एमएच.१९.सीयू.२७२७ ने आलेल्या एका इसमाने ओळखले का म्हणत, गाडीत बसण्याचा आग्रह केला. तरुणीने तीन वेळा नकार दिल्याने तो व्यक्ती निघून गेला.

---Advertisement---

दुसऱ्या दिवशी संबंधित कार चालकाची माहिती काढली असता कार नितीन पाटील व्यक्तीच्या नावे असून ती आरटीओ कार्यालयातील लिपीक दिलीप पाटील वापरत असल्याचे समजले. तरुणीने याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांना तक्रार दिली होती. तक्रारीनंतर दिलीप पाटील यांनी माफीनामा लिहून दिला होता.

माफीनामानंतर पीडित तरुणीने पैसे घेतले अशी बदनामी केली जात असल्याने तिने रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---