---Advertisement---
बातम्या

भुसावळमार्गे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ सात रेल्वे गाड्या रद्द

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२३ । भुसावळमार्गे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील राउरकेला स्टेशन यार्ड येथे तिसऱ्या लाईनच्या करिता यार्ड रीमॉडेलिंगसाठीच्या कामासाठी काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. यादरम्यान, मुंबई-हावडा या मार्गावरील सात गाड्या ८ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या भुसावळ स्थानकावरून जाणाऱ्या असल्यामुळे अकोलेकर प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

railway station

दक्षिण-पूर्व रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, १२८६९ सीएसएमटी-हावड़ा एक्स्प्रेस ८ व १५ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. १२८७० हावड़ा-सीएसएमटी एक्स्प्रेस ६ व १३ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. २२५११ एलटीटी – कामाख्या एक्स्प्रेस १७ ऑक्टोबर रोजी, तर २२५१२ कामाख्या-एलटीटी एक्स्प्रेस १४ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस १५ ऑक्टोबर रोजी, तर १२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस १३ ऑक्टोबर रोजी धावणार नाही.

---Advertisement---

२२८४५ पुणे – हटिया एक्स्प्रेस ८ व ११ ऑक्टोबर रोजी, तर २२८४६ हटिया – पुणे एक्स्प्रेस ९ व १३ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. २०८११ पुणे-संतरागाछी एक्स्प्रेस १६ ऑक्टोबर रोजी, तर २०८२२ संतरागाछी-पुणे एक्स्प्रेस १४ ऑक्टोबर रोजी धावणार नाही. २२८९३ शिर्डी-हावड़ा एक्स्प्रेस १४ ऑक्टोबर रोजी तर २२८९४ हावड़ा-शिर्डी एक्स्प्रेस १२ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे. १३४२५ मालदा टाउन-सूरत एक्स्प्रेस ७ व १४ ऑक्टोबर रोजी, तर १३४२६ सूरत-मालदा टाउन एक्स्प्रेस १६ ऑक्टोबर रोजी धावणार नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---