⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

अमरावती येथून मुंबईसह पुण्यासाठी स्वतंत्र गाडी धावणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२१ । मेमू गाड्यांमधून प्रवास करणार्‍या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांना मंथली पासची सवलत द्यावी तसेच राजधानी एक्स्प्रेसला भुसावळला थांबा द्यावा तसेच अमरावती येथून मुंबईसाठी इंटरसीटी व पुण्यासाठी सुध्दा एक स्वतंत्र गाडी सुरू करण्याची मागणी झेडआरयुसीसीच्या बैठकीत भुसावळ येथील सदस्य परीक्षीत बर्‍हाटे यांनी केली. मुंबई येथे झोनल रेल्वे सल्लागार समितीच्या ऑनलाईन बैठक मंगळवारी झाली. मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला मात्र राजधानी एक्स्प्रेसला भुसावळात थांबा देण्याबाबतचा निर्णयाचा चेंडू रेल्वे बोर्डाकडे टोलवण्यात आला आहे.

या मागण्यांबाबत प्रशासनाकडे आग्रह
या बैठकीत भुसावळातील सदस्य परीक्षीत बर्‍हाटे यांनी अमरावती स्थानकावरून अमरावती-मुंबई इंटरसिटी गाडी सुरू करावी तसेच पुण्यासाठी सुध्दा स्वतंत्र गाडी सुरू करावी, दिल्लीकडे जाणार्‍या राजधानी एक्स्प्रेसला भुसावळात थांबा द्यावा, अशी मागणी केली. राजधानीला थांबा देण्याचा अधिकार रेल्वे बोर्डाला असल्याचे जीएम यांनी सांगितले.
भुसावळ येथून सुटणार्‍या मेमू गाड्यांना मंथली पास सुविधा सुरू करण्याची मागणीही बर्‍हाटे यांनी केल्यानंतर प्रशासनाने त्याबाबत व नवीन रेल्वे गाड्यांबाबत सकारात्मक दर्शवली.

हे देखील वाचा :