जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । पत्रकार बांधवांना व्हॅकसिन लसीकरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करण्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिले निवेदन.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारी ने थैमान घातले असुन प्रचार ,प्रसिध्दी, ची मोलाची जबाबदारी साभाळनारे कोरोना योद्धा पत्रकार हे लोकशाही चे चवथा आधारस्तंभ आहे. कोरोनामुळे अनेक पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते बाधंवानचा जिव गेला असुन प्रतत्रका हे अनेक शासकीय, निमशाकि व सामाजिक कार्यक्रमांना जातात.
तसेच वृत्तपत्र विक्रेते बाधंव हे आपला जीव धोक्यात घालून समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना वृत्तपत्र देत असतात म्हणुनच यासाठी जळगाव शहरातील सर्व पत्रकार बाधंव, प्रेस फोटो गॉफर व ईलेटॉनिक मिडीया, व वृत्तपत्रे विक्रेते यांना कोरोना व्हॅकसिन लसीकरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे भाजपा जळगाव जिल्हा अध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी या पत्राद्वारे केली आहे. असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.