---Advertisement---
भुसावळ

खळबळजनक : भूलतज्ञ डॉक्टर घरात आढळले मृतावस्थेत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । डॉ.नितीन रामचंद्र पाटील (वय ३६) हे गुरुवारी सकाळी आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. आज शवविच्छेदन झाल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल.

crime 2022 06 17T120359.002 jpg webp

भुसावळ शहरातील श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व एबीबीएस भूलतज्ञ डॉ.पाटील हे आपल्या कुटुंबासह शहरातील मोहीतनगरात वास्तव्यास आहे परंतु, गुरुवारी ते एकटेच होते. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ते रुग्णालयात न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिंग वाजूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने कर्मचाऱ्यांनी मोहितनगरातील त्यांचे राहते घर गाठले. घराचा दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी डाॅ.पाटील हे बेडखाली मृतावस्थेत आढळले. बेडवर, खाली व दरवाजात काही सिरिंज आणि औषधी पडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या घराबाहेर गर्दी केली.

---Advertisement---

तोंडातून पिवळसर द्रव
डॉ.पाटील यांच्या तोंडातून व नाकातून पिवळसर द्रव बाहेर आलेला होता. तसेच ओठातून रक्त आले होते, असे हॉस्पिटलने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

मिरगीचा होता आजार
डॉ.नितीन पाटील यांना मिरगीचा आजार होता. बुधवारी रात्री शहरातील अस्थीरोग तज्ञ डॉ.नीलेश महाजन यांच्याकडे त्यांनी व्हिजीट दिली. रात्री आठ वाजेपर्यंत डॉ.पाटील हे रुग्णालयात होते. मात्र, गुरुवारी ते हॉस्पिटलला न पोहोचल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांचे घर गाठल्यावर घटना उघड झाली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---